web-ads-yml-728x90

Breaking News

नोकरी इच्छुक उमेदवार,शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा


BY - युवा महाराष्ट्र लाइव्ह  ठाणे |
राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरीइच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन लिंक करण्याची आवश्यकता आहे,अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती कविता हजावळे यांनी दिली आहे. नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा , सुविधा ऑनलाईन पध्दतीने वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येत आहेतराज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणा-या विविध रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम  योजनेअंर्तगत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळवणे,केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणा-या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणा-या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता अद्ययावत करणे, पत्ता,संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरूस्ती करणे, वेगवेगळया उद्योजकांनी वेळोवेळी  अधिसूचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे.
                उद्योजकांच्या मागणीनुसार उमेदवारांच्या याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी नोंदणीस आधार लिंक असणे आवश्यक आहे. आधार कार्ड लिंक करण्याची मुदत दि. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत देण्यात आली आहे. त्यानंतर आपली नोंदणी रद्य करण्यात येईल. अनेक बाबींचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने नोंदणीस आधार कार्ड जोडणी  करणे गरजेचे आहे. असे कविता ह. जावळे सहायक आयुक्त,यांनी स्पष्ट केले आहे. आधिक माहिती करीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,ठाणे, जुने कोषागार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे -400601 या कार्यालयाच्या वरील पत्यावर ई-मेल asstdiremp.thane@ese.mahashtra.gov.in अथवा दुरध्वनी क्र. 022-25428300 वर संपर्क साधावा.


No comments