ई-माध्यमांचा प्रभावी वापर करून कृषी विभाग अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा
BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
रानभाज्या
महोत्सव, बांधावर खते व बियाणे असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून कृषी विभागामार्फत
चांगले काम होत आहे. त्याचबरोबर ई-माध्यमांचा प्रभावी वापर करून कृषी विभाग
अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना राज्याचे
कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.
मालेगाव येथून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यस्तरीय कृषी
विभागाचा आढावा मंत्री श्री.भुसे यांनी आज घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या
कॉन्फरन्समध्ये कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी
आयुक्त धीरज कुमार, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांसह, राज्यातील सर्व संचालक, विभागीय कृषी संचालक,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प संचालक (आत्मा) उपस्थित होते.राज्यातील
शेतमजुरांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन सक्षम करा. कुशल शेतमजुरांना
सी.एस.आर.च्या माध्यमातून आवश्यक किट्स उपलब्ध करून देण्याच्या सुचना देतांना
कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले, कृषी विभागामार्फत आतापर्यंत १० हजार
८४६ शेतमजुरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी
शेतमजुरांची निवड करतांना प्रत्यक्ष काम करणाऱ्या शेतमजुरांची निवड करण्यात यावी.
प्रत्येक जिल्ह्यात नियमितपणे प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनर तयार करण्यात
यावे. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक लोकप्रतिनींच्या उपस्थितीत कार्यक्रमांचे आयोजन
करून अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांना व्यापक स्वरूपात प्रसिद्धीचे नियोजन करण्याच्या
सूचना कृषीमंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या.
No comments