web-ads-yml-750x100

Breaking News

रोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र – गृहमंत्री अनिल देशमुख


BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - अलिबाग 

  रोहा तांबडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले.मौजे तांबडी, तालुका रोहा येथील पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आले असताना बोलत होते.यावेळी  पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, पोलीस महानिरीक्षक निकीत कौशिक, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, पोलीस उपअधीक्षक श्री. किरणकुमार सूर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव उपस्थित होते.

No comments