0

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव्ह मुरबाड |
मुरबाड पोलिस ठाण्यात कर्तव्यपरायण भुमिकेत कार्यरत म्हणून ज्यांनी निर्भिडता जपत सद्रक्षणाय खलनिग्रहणालयाच्या पारदर्शकतेचे खरे प्रतिक मेजर वाघमारे यांचे हृदयविकाराने निधन झाले.त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र शोकाकूळ पसरली आहे.नेहमी हसणारा चेहरे,कधीही माघार न घेणारे,सर्वांना मदत करून त्यांना सहकार्य करणारे,सर्वांचा लाडका ढाण्या वाघाची कार्यभुमि भुषवणारे,म्हणून मुरबाड पोलिस ठाण्यात मामा म्हणून त्यांची ओळख होती.आजपर्यंत अनेक चांगली शिकवण देऊन त्यांना चांगल्या मार्गाला नेण्याचा मानस केवळ देवमाणूसच करू शकतो असाच देवमाणूस मुरबाड शहाराला पोलिस म्हणून भुमिकेतून लाभला.एक चांगला व्यक्तीमत्व त्यांच्या अंगी होता.त्यांच्याजवळ येणारा प्रत्येक माणूस हा आपल्या कुटूंबातील सदस्य आहे असे समजणारे वाघमारे मामा आज आपल्यात नसल्याचे दुखः होत आहे परंतु इश्‍वरच्या इच्छेपुढे कोणाचे काही चालेना.अशा कर्तव्यदक्ष म्हणून संपुर्ण आयुष्य पोलिस क्षेत्राच्या माध्यमातून गुन्हेगारी नाहिशी करणारे मेजर वाघमारे मामांना सर्व स्तरातून नागरिकांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करत त्यांच्या जीवनकार्याला समाल केला आहे.

Post a comment

 
Top