web-ads-yml-728x90

Breaking News

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे महिला पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे आपले घरदार, नातेसंबंध बाजूला ठेवून लोकांच्या रक्षणार्थ झटणाऱ्या महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आज रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने त्यांच्या हक्काचा मोठा बंधू गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या रुपाने मिळाला. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या नात्याने गृहमंत्र्यांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन साजरे केले.यानिमित्ताने त्यांनी सर्व महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांची,त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली. कोविड-१९ च्या लढ्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमच्या महिला पोलीस कर्मचारी भगिनी नेटाने लढा देत आहेत. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कर्तव्याबरोबर सामाजिक जाणिवेतून लोकहित जपणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले.


No comments