web-ads-yml-728x90

Breaking News

सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

BY - युवा महाराष्ट्र लाइव-  सातारा  |

सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आता मोठ्या प्रमाणात आढळत आहे. या दोन्ही जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले पाहिजे. तसेच प्रत्येक कोरोना रुग्णामागे कमीत कमी 15 निकट सहवासितांची टेस्ट केली पाहिजे. यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात येईल. तसेच या जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावा, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्या.कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या अध्यक्षतेखाली तर खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती सातारा-कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संदर्भात आढावा बैठक आज संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकास  मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार मकरंद पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, हातकणंगलेचे  आमदार राजू आवळे, कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव, कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके , सातारा जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

No comments