0


 BY - युवा महाराष्ट्र लाइव्ह नवी दिल्ली |

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स-इंडिया यांनी दिल्ली जर्नालिस्ट असोसिएशन आणि यूपी जर्नालिस्ट्स असोसिएशनसह देशभरातील पत्रकारांच्या सतत होणा -या खून आणि छळाचा निषेध करण्यासाठी २९ऑगस्ट रोजी निषेध प्रदर्शन आंदोलन जाहीर केले आहे. त्यात मोठ्या संख्येने माध्यमकर्मीं सहभागी होतील.एनयूजेचे अध्यक्ष रास बिहारी म्हणाले की, उत्तर प्रदेशात पत्रकारांचे सतत खून होत असतात पण सरकार आणि प्रशासन गप्प आहेत. यामुळे असामाजिक तत्त्वांना  बळकटी मिळते आहे. ते म्हणाले, आम्ही काही काळापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिवंगत पत्रकार विक्रम जोशी यांच्या परिवाराला एक कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी केली होते. तसेच पत्नीस शासकीय नोकरी देण्याची व मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. पण हे झाले नाही. आता आम्ही पत्रकार स्व.रतनसिंग यांच्या परिवारास एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करतो. ते म्हणाले की, उत्तराखंडमधील पत्रकारांना खोटे खटले करून तुरूंगात पाठविले जात आहे. पत्रकार शिवप्रसाद सेमवाल यांच्या अटकेबाबत नैनीताल उच्च न्यायालयानेही सरकारला फटकारले आहे.

एनयूजे अध्यक्ष रास बिहारी, दिल्ली जर्नालिस्टस् असोसिएशनचे अध्यक्ष राकेश थापलियाल, सरचिटणीस केपी मलिक आणि उपजाचे अध्यक्ष रतन दीक्षित यांनी सांगितले की, बलिया जिल्ह्यात पत्रकार रतन सिंहची  गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, पत्रकारांच्या हत्येबाबत माध्यमविश्वात प्रचंड संताप व्यक्त होतो आहे .राज्यात कायदा व सुव्यवस्थाबिघडली  आहे आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यशैलीमुळे पत्रकारांवर हल्ले वाढले आहेत.पोलिस यंत्रणा राज्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. वृत्तवाहिनीचे पत्रकार रतन सिंह यांना दोन दिवसांपूर्वी बलिया जिल्ह्यातील फाफना येथे गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते.

पत्रकार रतन सिंह यांच्या हत्येची न्यायालयीन चौकशीची मागणी एनयूजेचे अध्यक्ष रास बिहारी यांनी केली आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची त्वरित दखल घेत त्यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करावी व निष्काळजीपणा करणा-या पोलिसांवर कठोर कारवाई करावी व नुकसान भरपाईची रक्कम वाढवावी अशी मागणी केली.

देशाच्या राजधानी शहरालगतच्या गाझियाबाद येथे एका महिन्यापूर्वी पत्रकार विक्रम जोशी यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. पत्रकारांच्या हत्येमुळे मीडिया जगतात प्रचंड रोष आहे. राज्यातील पोलिस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यामुळे पत्रकारांवर हल्ला करण्यात आला आहे. पत्रकारांच्या हत्या व छळाविरूद्ध संसदेवरील निदर्शनात अधिकाधिक माध्यमकर्मींनी सहभागी व्हावे असे आवाहन डीजेए अध्यक्ष राकेश थपलियाल यांनी केले आहे. डीजेएचे सरचिटणीस केपी मलिक म्हणाले की दोन्ही संघटनांच्या वतीने निदर्शनानंतर राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येईल.

 

Post a Comment

 
Top