0

BY - युवा महाराष्ट्र लाइव्ह - ठाणे |
महाराष्ट्रातील पत्रकारांची प्रतिथयश संघटना अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी दै. वृत्तप्रकाशचे संपादक नितीन शिंदे यांची, तर पत्रकार व स्तंभलेखक संजय दळवी यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. १५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आलेली असून, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, कोकण विभागीय अध्यक्ष भगवान चंदे, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव आदि पदाधिकाऱ्यांनी बैठकीनंतर ठाणे जिल्हा कार्यकारिणीला मंजुरी दिली. याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष नितीन शिंदे यांनी नियुक्तीपत्र बहाल केली. पत्रकार संघाची ध्येयधोरणे प्रामाणिकपणे पार पाडतानाच, प्रशासन आणि जनता यांमधील दुवा म्हणूनच सर्वांनी निष्ठेने व निर्भयपणे कार्यरत राहावे, असे मत शिंदे यांनी व्यक्त करून सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.दरम्यान,भारताच्या ७३व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची ठाणे जिल्हा कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष विलास पाटील, सचिव संजय दळवी, संघटक शिवाजी कोळी, सहसचिव सचिन ठिक, सहसचिव ज्योती चिंदरकर, सहसंघटक सीमा गुप्ता, प्रसिद्धीप्रमुखपदी सुबोध कांबळे, देवेंद्र शिंदे, अमित गुजर, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून सुधीर घाग आणि विनू मॅथ्यू यांची निवड करण्यात येऊन सर्वांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, ही राज्यातील मान्यताप्राप्त संघटना असून, पत्रकारांच्या न्याय्य-हक्कांसोबतच, "जनसेवा हीच ईश्वर सेवा" हे ब्रीद उराशी बाळगून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी संघटना म्हणून आम्ही सतत कार्यरत राहू, असे संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नितीन शिंदे यांनी यावेळी शेवटी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

Post a comment

 
Top