पुण्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची धडाकेबाज कारकीर्द
BY - युवा महाराष्ट्र लाइव- पुणे |
पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख आज (19 ऑगस्ट)
सूत्रे स्वीकारणार आहेत. डॉ. देशमुख यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्याने
जिल्हा प्रशासन अधिक एकसंघ व कार्यक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला
जात आहे.
(Pune New Collector Dr Rajesh Deshmukh Bio)डॉ. राजेश देशमुख हे भारतीय प्रशासकीय
सेवेतील कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी, यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. डॉ.
राजेश देशमुख यांची क्षमता लक्षात घेऊनच पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील कोरोनोचं
वाढतं आव्हान पेलण्यासाठी त्यांची जिल्हाधिकारीपदी निवड केलीडॉ. राजेश देशमुख हे भारतीय
प्रशासकीय सेवेच्या 2008 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून
कारकिर्दीची सुरुवात केली. एमपीएससी परीक्षेत राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण
होण्याचा मान त्यांनी मिळवला होता.
No comments