web-ads-yml-728x90

Breaking News

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण तातडीने सुरू करण्याचे निर्देश

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

सध्याची कोरोनाची स्थिती पाहता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण तातडीने सुरू करावे अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.  राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व उर्वरित सर्व भारतीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रांचा आढावा आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याबाबत उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

No comments