web-ads-yml-728x90

Breaking News

"सिंगिंग स्टार" या रियालिटी शो मधुन गायिका कविता राम करणार अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुगध..!!


BY - महेश मस्कर,युवा महाराष्ट्र लाइव्ह पाटण |
सोनी मराठीवरती सुरु होणारा "सिंगिंग स्टार" या रियालिटी शो मध्ये पाटण तालुक्यातील कन्या आपल्या गोड आणि सुमधुर आवाजाने संपुर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करून वेड लावले आहे. तसेच "चिमणी उडाली भुर्रर्र" अशा लोकप्रिय गाण्यांची पार्श्वगायिका त्याचबरोबर अनेक मराठी चित्रपट सिरियल्स ची गाणी आपल्या गोड आवाजामध्ये गायली आहेत.अशी सुप्रसिद्ध  गायिका कविता राम या अभिजित केळकर सोबत त्याच्या गुरु च्या रुपात सर्वांच्या भेटीला लवकरच येत आहे; तसेच कविता राम यांना पाटण तालुक्यामधुन भरभरुन प्रतिसाद भेटत आहे.अशा या गान कन्येचे सर्वञ कौतुक होत आहे.ही बाब पाटणकरांसाठी अभिमानास्पद आहे..!

No comments