BY - युवा महाराष्ट्र लाइव- नागपूर |
संस्कृत भाषा ही जगातील सर्व भाषांची जननी आहे. सर्व विषयांच्या
ज्ञानाचे उगमस्थान असलेल्या या जगतजननीच्या पुन:जागरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल तथा
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.रामटेक येथील कविकुलगुरु
कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या विस्तार सेवा मंडळातर्फे ‘ऑनलाईन संस्कृत महोत्सव’
आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन करताना श्री. कोश्यारी बोलत होते.केंद्रीय
मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राष्ट्रीय
संस्कृत संस्थानचे माजी कुलगुरु प्रो. व्ही. कुटुंबशास्त्री, ‘संभाषण संदेश’चे संपादक
डॉ. जनार्दन हेडगे, विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव प्रो.
विजयकुमार यावेळी उपस्थित होते.
Post a comment