web-ads-yml-728x90

Breaking News

शेतकरी वर्गातील लोकप्रियता - समाजसेवक बाळयामामा म्हात्रे


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव्ह भिवंडी |
जनसामान्यांचा संपर्क त्यात गरिबांचा अशिर्वाद यामुळे बाळयामामा म्हात्रे यांना यशप्राप्ती मिळाली असून भिवंडी तालुक्यासह संपुर्ण ठाणे जिल्हयात त्यांच्या सामाजिक कार्याची चर्चा आहे.गरिबाची जान असणार्‍या बाळयामामा म्हात्रे यांना शेतकरी बांधवांनी मानाचे मान दिले आहे.सकाळपासून रात्रौपर्यंत समाजातील प्रत्येक घटकांतील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणारे मामा नागरिकांच्या गळयातील तावीत झाले आहेत.मदतीची हाक म्हणून बाळयामामा म्हात्रे यांची कार्यप्रणाली भाऊन जाणारी ठरत आहे.भिवंडी जरी गाव असले तरी संपुर्ण ठाणे जिल्हयात त्यांचे कार्य गगनभरारी आहे.गावाचा विकास म्हणजे तालुक्याचा विकास आणि तालुक्याचा विकास म्हणजे जिल्हयाचा विकास अशी मनोधारणा मनात बाळगून नेहमी सगळयांच्या दुखःत सामील होणारे मामा यांनी जनसामुदायांना कौटूंबिक सदस्य असल्याचे जे वचन दिले ते पुर्ण करतांना आपल्याला पाहण्यास मिळत आहे.गावागावात अतिदुर्गम भागात स्वतः मामा जात असून त्यांच्या अडीअडचणींवर मात करण्यात त्यांचा वाटा सिंहाचा ठरला आहे.उद्दयाचा भविष्य हा तरूणवर्गांना संधीचा जावो म्हणून अनेक बेरोजगारांना नोकरी मध्ये,गोडाऊन मध्ये विविध पदावर कामावर घेऊन बेरोजगाराला दुर करण्यात यश आल्याने बाळयामामा म्हात्रे हे नवतरूणांचे मार्गदर्शक बनले आहेत.पैसे देऊन माणसे मागे फिरवणारा नेता आपण पाहिले आहे परंतू गरिबांसाठी जो करतो त्यामागे येणारा समुदाय हा पैशाचा नसतो तर माणूसकीचा  असतो हे बाळयामामा म्हात्रे यांच्या कार्यसिध्दीतून दिसून आले आहे.त्यांच्यामागे येणारा जनसमुदाय हा पैशाचा नसून माणूसकी जपणारा आहे. अशा शेतकरी घराण्यातून वैभव उभे करून आपणाला मिळालेली झळ ही आजच्या युगातील तरूणांना नको म्हणून त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटूंबातील धडपड करणारे मामा लोकप्रियता ठरले आहे.कष्टकरी शेतकर्‍याच्या मदतीच्या हाकेच्या साथीला बाळयामामा म्हात्रे धाऊन जातात अशाच कार्यप्रणालीचा झोत गरिबांच्या दिव्याची वात बनली आहे.अनेक शेतकरी वर्गांच्या आर्थिक अडचणीला मदतनीस ठरलेले मामा अनेकांना चांगल्या मार्गाचे मार्गदर्शन करतात.याच माणसातील माणूसकीमुळे बाळयामामा म्हात्रे यांना संपुर्ण ठाणे जिल्हयातील नागरिकांनी जीवाळयाची ओढ म्हणत त्यांच्या विचारांची प्रशंसा केली जात आहे.गरिबीतून उंचावलेल्या बाळयामामा म्हात्रे यांनी शेतकर्‍यांसाठी विविध उपाययोजना सुरू केल्याचे सुत्रांकडून कळाले आहे.


No comments