0


BY - मिलिंद दळवी, युवा महाराष्ट्र लाइव-  उल्हासनगर |

उल्हासनगरमध्ये वडापावच्या दुकानात सिलिंडरचा भीषण स्फोट झालाय. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर चार परिसरातील व्हीनस चौकातील 'जय मातादी' नामक वडापावच्या दुकानात सिलिंडरचा भीषण स्फोट झालाय. प्राथमिक माहितीमुसार सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या रवाना झाल्यात आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहेत.

साधारण दोन वाजताच्या सुमारास या वडापावच्या दुकानात स्फोट झाला आणि यामध्ये स्वतः मालक, दुकानात काम करणारे कामगार आणि काही ग्राहक असे एकूण सात जण जखमी झाल्याचं समजतंय. या सर्वांना उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी भरती करण्यात आलं आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचंही समजतंय.


Post a comment

 
Top