BY - युवा महाराष्ट्र लाइव- नांदेड |
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही काळजीची बाब
असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर सर्व संबंधित यंत्रणांनी
समन्वय साधत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग
नव्याने उपलब्ध झाला असून जिल्हा रुग्णालयाचा स्वतंत्र प्रस्ताव शासनस्तरावर दाखल करुन
घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा
मृत्यूदर, जिल्ह्यातील तपासणी मोहिम, आरोग्यविषयक अत्यावश्यक असणाऱ्या सेवा सुविधा
याचा आढावा घेऊन शासनस्तरावर लागणारी मदत तात्काळ उपलब्ध करुन देता यावी यासाठी पालकमंत्री
चव्हाण यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.
प्रदिप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, आयुष संचालनालयाचे
संचालक डॉ.कुलदिपराज कोहली यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या सर्व विभाग प्रमुखांसमवेत
बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी नांदेड जिल्ह्यात कुठल्याही वैद्यकीय सेवा-सुविधा
कमी पडता काम नयेत याचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
Post a comment