web-ads-yml-750x100

Breaking News

मुरुड, आगरदांडा परिसरात कायमस्वरूपी मत्स्यजेट्टी उभारणीचा प्रस्ताव तयार करा – मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

रायगड जिल्ह्यात मुरूड, आगरदांडा परिसरात कायमस्वरूपी मत्स्यजेट्टी उभारणीसाठी प्रस्ताव तयार करावा; तसेच सध्या उपलब्ध जेट्टींची पाहणी करून योग्य ठिकाणी मत्स्यव्यवसायासंबंधी सुविधा उपलब्ध कराव्यात, असे निर्देश मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले.रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील आगरदांडा प्रवासी जेट्टीवर मासेविक्री करण्याबाबत आणि खोराबंदर येथे तात्पुरती जेट्टी बांधकामाबाबत श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. त्यावेळी श्री. भरणे यांनी या सूचना दिल्या. बैठकीस रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे अधिकारी तसेच मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments