BY - युवा
महाराष्ट्र लाइव- नवी दिल्ली |
केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत
ही माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने तपासणी केली
असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं आहे. त्यामुळे खबरदारी
म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची
माहिती अमित शाह यांनी दिली आहे.
Post a comment