web-ads-yml-728x90

Breaking News

विक्रोळीत राष्ट्रवादीकडून कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

कर्नाटक सरकारने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाजांचा पुतळा रातोरात हटवून शिवरायांचा अपमान केल्यामुळे आज सर्वत्र ठिकाणी आंदोलनाची लाट उसळताना दिसत आहे. कर्नाटकातील बेळगाव येथील मनगुत्ती गावात लावण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविण्यात आला. या प्रसंगात महाराष्ट्रातून, कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. ह्यावेळी विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर सेल जिल्हा अध्यक्ष डॉक्टर योगेश भालेराव व महाराष्ट्र युवक नेते नितीन माने ,तालुका अध्यक्ष अब्दुल अन्सारी, युवा नेते अजित पिसाळ ,सोशल मीडिया सेलचे शंतनु शेळके व सर्व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते ह्यांनी आज विक्रोळी पूर्वेला असलेल्या टागोरनगर ग्रुप नंबर एक ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना पुष्पहार घालून कर्नाटक सरकारचा घोषणा देत जाहीर निषेध केला.

No comments