web-ads-yml-728x90

Breaking News

राज्य आणि देश सर्वोत्तम झाला पाहिजे हे स्वप्न कायम बाळगा

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाराष्ट्राचे वैभव आणि उद्याचे भाग्यविधाते उमेदवार भविष्यातील जबाबदारीची परीक्षादेखील जिद्दीने पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना माती आणि मातेला मात्र विसरू नका, असा सल्लाही त्यांनी प्रशासकीय सेवेत रूजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला.केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील 79 उमेदवारांचा गौरव समारंभ महाराष्ट्र विधानमंडळामार्फत विधानभवन येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी यावेळी उपस्थित होते.

No comments