BY - युवा महाराष्ट्र लाइव- कोल्हापूर |
कोणत्याही साथीला सामोरे जाण्यासाठी रूग्णालयांची आवश्यकता
आहे. यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण
रूग्णालय उभे करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक
ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.सक्षम ग्रामीण
आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील 10 ग्रामीण रूग्णालय व दोन उपजिल्हा रूग्णालयांमध्ये
करण्यात आलेल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. ठाकरे
यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून आज झाला.
Post a comment