BY - युवा महाराष्ट्र लाइव- नागपुर |
अयोध्येतील राम मंदिराच्या
भूमिपूजन सोहळ्यानिमित्त नागपूरात जल्लोष करण्यात आला होता. यामधे भाजपच्या वतीनं चौकाचौकात
रांगोळ्या, लाडू वाटप, राम नामाचा जयघोष आणि महाआरती करण्यात आली. यात अनेकांनी कोविड 19 च्या शासनानं दिलेल्या दिशा निर्देश चे
पालन केलं नाही. त्यामुळं पोलिसांनी काही भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे तर काहींना नोटीस
दिल्या आहेत. नागपुरातील 9 पोलीस स्टेशन मध्ये 14 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत भाजपनं
यावर आक्षेप घेतला असून हे गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी माजी मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजप आमदारांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं. दहा ठिकाणी
दिशानिर्देश पाळले गेले नसतील त्या ठिकाणी गुन्हे दाखल करा, मात्र 90 ठिकाणी कुठल्याही
नियमांचं भंग केलं नसताना गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे. राम नामाचा जयघोष करणं, जल्लोष
करणं यात काय गैर आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. पोलिसांनी संयमाने काम करावे
असे अशी विनंती बावनकुळे यांनी केलीय.
Post a comment