0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- उल्हासनगर |

जनसंपर्क अधिकारी हे पद प्रशासन व जनतेत समन्वय साधण्यासाठी निर्माण केलेले पद असताना उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे हे पत्रकारांत दुजाभाव करीत असल्याची तक्रार "दैनिक  बातमीदार" या दैनिकाचे अधिकृत प्रतिनिधी सिद्धांत गाडे यांनी एन.यु.जे महाराष्ट्र या संघटने कडे केली . दि. 23 ऑगस्ट रविवार रोजी कोरोना विषयक माहिती घेण्यासाठी पायपीट करीत महापालिकेत सिद्धार्थ गाडे गेले असता त्यांना युवराज भदाणे  यांनी दुजाभाव करत अपमानस्पद वागणूक दिली.

दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान वरिष्ठ पत्रकार सिद्धांत गाडे हे पत्रकार कक्षात जाण्याच्या उद्देशाने महापालिका गेट जवळ आले असता, ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षक पंचू यादव याने, आपको प्रवेश देनेके लिए भदाणे साहाबने मना किया है, असे सांगून महापालिकेत प्रवेश देण्यास मज्जाव केला. यावर गाडे यांनी इतर पत्रकार महापालिकेत उपस्थित असताना मलाच का अडवता ? असे विचारले असता, सिर्फ आपके लिये भदाणे साहाबने मना किया है ! असे सांगितले. अशा पद्धतीने वारंवार पत्रकार मध्ये भेदभाव करत असल्यामुळे उल्हासनगर मधील अनेक स्थानिक पत्रकारांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळू देत नाही. हे महान अधिकारी उर्मट भाषेत दमदाटी करत  विविध कारणे सांगत भेदभाव करत असतात यामुळे या जबाबदारी असलेल्या शासनाच्या पदाची प्रतिमा मलीन होत आहे. अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी असे नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र.च्या अध्यक्षा शीतल करदेकर यांनी उल्हासनगर पालिका आयुक्तांना  ई-मेल द्वारे निवेदन पाठवून केली आहे.

Post a comment

 
Top