web-ads-yml-728x90

Breaking News

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेअकाराच्या सुमारास अयोध्येत दाखल

BY - युवा महाराष्ट्र लाइव-  लखनौ |

ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले आहेत, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा   संपन्न होत आहे. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेअकाराच्या सुमारास अयोध्येत दाखल झाले. त्यांनी हनुमान गढीला जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी रामलल्लाला साष्टांग दंडवत घातला.हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून आज (बुधवार 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 44 मिनिटांच्या मुहूर्तावर भूमिपूजन होत आहे. पंतप्रधान मोदी सकाळी साडेनऊच्या सुमारास दिल्लीतून अयोध्येकडे रवाना झाले. ते तासाभरात म्हणजे साडेदहाच्या सुमारास लखनौमध्ये दाखल झाले.


No comments