0

BY - युवा महाराष्ट्र लाइव- गडचिरोली |

जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये कोरोना बाधितांना भेटून त्यांची विचारपूस केली. यावेळी रूग्णांना सॅनिटायझर कीट व पोषक आहार कीटचे वितरण त्यांनी केले. यावेळी सोबत जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे उपस्थित होते. या भेटीदरम्यान त्यांनी रूग्णांना लवकर बरे होण्याबाबत शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी सर्व रूग्ण तसेच जवान लवकर बरे होतील असी सदिच्छा व्यक्त केली. ते म्हणाले रूग्णांना कोणतेही लक्षणे नाहीत. कोरोना विषाणू विरोधात ते उत्तम लढा देत आहेत. तसेच ते लवकर बरे होवून घरी जातील.


Post a comment

 
Top