web-ads-yml-728x90

Breaking News

‘नेटफ्लिक्स’ च्या बनावट वेबसाईटपासून सावध रहा!

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईट संदर्भात फसवणूक होण्याची शक्यता असून हे करणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे करण्यात येत आहे.सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे . काही नेटफ्लिक्सच्या वापरकर्त्यांना त्यांच्या बिलिंग अपयशाच्या समस्येसंदर्भात ईमेल प्राप्त झाले आहेत. ईमेलने वापरकर्त्यांच्या नेटफ्लिक्स सदस्यता २४ तासांत रद्द करण्याचा दावा केला आहे, ज्यामुळे अनेकजण त्यांचे पेमेन्ट पूर्ण करण्यासाठी लिंक वर क्लिक करतील. एकदा वापरकर्त्याने लिंकवर क्लिक केले की, वापरकर्त्याला नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाइटवर नेले जाते . वापरकर्त्यांना त्यांचे नेटफ्लिक्स लॉगिन प्रमाणपत्रे, बिलिंग पत्ता आणि क्रेडिट कार्ड तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाते . एकदा पूर्ण माहिती प्रविष्ट केल्यावर वापरकर्त्याला नेटफ्लिक्सच्या ओरिजिनल  वेबसाइटवर नेले जाते आणि या  प्रकारे फिशिंगचा प्रवाह पूर्ण होतो. अशा प्रकारे वापरकर्त्यांच्या नकळत त्यांच्या कार्डची माहिती घेतली जाते आणि फिशिंग घोटाळ्याला बळी पाडले जाते. सेन्डर्स चा ई-मेल आय डी पाहता (netfiix@csupport.co), हे स्पष्ट होते की.सायबर क्रिमिनल्सनि तो कायदेशीर (ओरिजिनल) दिसावा म्हणून पुरेपुर प्रयत्न केला आहे, ज्यामुळे नेटफ्लिक्स ग्राहक फिशिंग घोटाळ्याला बळी पडतील.


No comments