0

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

उस्मानाबाद शहरातील ख्वाजानगर, दिल्ली कॉलनी खिरणी मळा, गालिब नगर भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासनावरचा वाढता ताण पाहून पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने मुस्लिम समाज बांधवांनी शहरातील दोन मदरसे रुग्णांना क्वॉरंटाइन करण्यासाठी उपलब्ध केले आहेत. तसेच सोमवारपासून चार मोहल्ला क्लिनिक सुरू करून उपचार सेवाही देण्यात येणार असल्याने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांचे समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले.श्री.गडाख माहिती देतांना म्हणाले शहरातील मिनार मशिदीजवळ असलेल्या दारूल उलूम मदरशात महिलांसाठी क्वॉरंटाइन केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे २६ महिलांना क्वारंटाइनही करण्यात  आले आहे. तसेच संत ज्ञानेश्वर मंदिरासमोर उर्दू मदरशात १०० पुरुषांसाठी क्वॉरंटाइन केंद्र सुरू झाले असून तेथे १६ पुरुषांना दाखल करण्यात आले आहे. संपर्कातील व्यक्ती पासून प्रसार रोखण्यासाठी बाहेरील व्यक्तींना प्रवेशापासून रोखण्यासाठी दरवाजावर सुरक्षा   रक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे.


Post a comment

 
Top