पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेत्तर उपक्रमांना परवानगी देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण
करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. तेथील जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेत्तर
उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी मांडली. पश्चिम घाट जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत मुख्यमंत्री यांच्या वर्षा या निवासस्थानी
आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. पश्चिम घाट
जैवविविधतेच्या संरक्षणाबाबत व गावे वगळण्यासंदर्भातील आपली ही भूमिका केंद्र
सरकारला स्पष्टपणे कळविण्यात येईल असेही ते म्हणाले.
No comments