0

BY - युवा महाराष्ट्र लाइव- पाटणा |
अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात करण्यासाठी पाटणा पोलिसांनी आयपीएस विनय तिवारी यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस अधिकारी मुंबईत पाठविले आहेत. मात्र मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना मुंबई महापालिका प्रशासनाने बळजबरीने क्वारंटाईन केले असल्याचा आरोप बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे.यावेळी बोलताना ते म्हणाले, की पाटण्याचे सिनियर सुपरिडेंट ऑफ पोलीस विनय तिवारी यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस अधिकारी रविवारी मुंबईत 11 वाजता दाखल झाले. त्या नंतर त्यांना मुंबई महापालिका प्रशासनाने बळजबरीने क्वारंटाईन केले आहे. त्यांना आयपीएस मेसमधील राहण्याची व्यवस्थाही नाकारण्यात आली आहे.

Post a comment

 
Top