आपत्कालीन परिस्थितीतही विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरुच!
BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
कोरोना (COVID-१९)
विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात व संपूर्ण राज्यात संचारबंदी
लागू करण्यात आलेली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व
शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले. असे असले तरी, संचारबंदीच्या कालावधीमध्ये प्रत्येक
विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्येही विविध
माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु असून त्यासाठी शालेय शिक्षण
विभागातर्फे ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली जाते
आहे.गुगल क्लासरुमच्या माध्यमातून विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी
यांच्यामध्ये होणारे परस्परसंवादी शिक्षणाचे व्हीडिओ ऑफलाईन स्वरूपामध्ये देखील
इतर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देता येणार आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण विभाग
या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध माध्यमांद्वारे विद्यार्थी शिक्षण सुरु
ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण
विभागामार्फत देण्यात आली आहे.
No comments