0

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समारोह कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांनी  या कार्यक्रमासाठी ऑनलाईन  युट्यूब च्या माध्यमातून  https://youtu.be/EpQ2y3-Swfs या लिंकद्वारे सहभागी व्हावे असे आवाहन श्री. सामंत यांनी केले.आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.त्यावेळी ते बोलत होते.श्री. सामंत म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी समारोह कार्यक्रमाचे शनिवार दिनांक १ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११:३० वाजता ऑनलाईन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित राहणार आहेत.


Post a comment

 
Top