web-ads-yml-728x90

Breaking News

ग्रामपंचायत हॉस्पिटल आणि AMBULANCE चा उदघाटन समारंभ...


BY - भास्कर विशे,युवा महाराष्ट्र लाइव- शहापूर |
आज दिनांक १ ऑगस्ट २०२० रोजी ग्रुप ग्रामपंचायत दळखन व ASSOCIATION OF SOCIAL BEYOND BOUNDARIES यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रामपंचायत हॉस्पिटल आणि AMBULANCE चा उदघाटन समारंभ पार पडला. ह्या उदघाटनाचे प्रमुख पाहुणे म्हणून   ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख व हातमाग महामंडळ अध्यक्ष  मा.श्री.प्रकाशजी पाटील,जि. प अध्यक्षा सुष्माताई लोने व मा.आमदार पांडुरंगजी बरोरा यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
     या दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा एकच उददेश आहे की ग्रामीण भागात सहसा एखादी व्यक्ति आजारी पडल्यास अथवा गंभीर आजार उद्भवल्यास प्राथमिक उपचार उपलब्ध व्हावेत व अतिगंभीर रुग्णास निदान शहापूर पर्यंत तरी पोहचता यावे हा आहे. आणि त्यासाठीच ग्रुप ग्रामपंचायत दळखन चे सरपंच मा.श्री.भगवान मोकाशी यांचा लोकांना तात्काळ सुविधा मिळाव्यात म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे. सरपंच पदावर बसल्यापासूनच त्यांच्या डोक्यात हा विचार सतत  चालू होता की प्रथम लोकांचे आरोग्य महत्वाचे आहे त्यासाठी आपल्या गावात मेडिकल सुविधा व एक छोटीशी रुग्णवाहिका असली पाहिजे. आणि या सुविधा देऊन त्यांचे ते स्वप्न आज पूर्ण झाले. याआधी केलेल्या कामांमध्ये  ग्रामपंचायत व स्मशानभूमीसाठी खाजगी विकासकाकडून विनामोबदला भूखंड मिळवणे,गावात डिजिटल शाळा,गावाला पिण्यासाठी आर ओ पाणी,सोलर रोड लाईट,संपूर्ण गावात वायफाय,संपूर्ण कर वसुली,वृक्षारोपण,आरोग्य शिबीर,जलकुंभ बांधणे (प्रस्तावित),शाळेची नवीन इमारत,पेव्हरब्लॉक रस्ते , डांबरीकरण रस्ते ,घनकचरा व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्यातील पहिली ई -घंटागाडी खरेदी केली,स्नेक कॅचर किट वाटप,CCTV कॅमेरे,फायर सेफ्टी किट वाटप,साउंड सिस्टीम वाटप,जेवणाची भांडी,कार्यालयात थंब मशीन बसविणे,हॅमस बसविणे, व्यायाम साहित्य वाटप,डझबिन वाटप,समाज हॉल,शैक्षणिक साहित्य,क्रिडा साहित्य वाटप तसेच गावातील समस्यांचे निवारण करण्यासाठी 24x7 हेल्पलाईन नंबर तसेच व्हाट्सअँप ग्रुप बनवण्यात आले असून त्यांनी अश्या अनेक योजना राबऊन आपल्या गावाचा चेहरामोहरा बदलवण्यासाठी अशी अनेक कामे त्यांनी दळखण ग्रामपंचायतच्या माध्यमातून केली आणि नविन संकल्पनेने ते पुढे काम करत आहेत

No comments