web-ads-yml-728x90

Breaking News

ठाण्यात 691 किलो गांजा जप्त, ट्रक चालक फरार...

BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव- ठाणे |

ठाण्यातील घोडबंदर रोड येथे तब्बल 691 किलो गांजा चितळसर पोलिसांनी पकडला आहे. मक्याच्या कणसाने भरलेल्या ट्रकमधून या गांजाची तस्करी करण्यात येत होती. आज पहाटे पोलिसांनी ट्रकसह 1 करोड 63 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.ठाण्यात एक ट्रक मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन येणार असल्याची माहिती चितळसर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई किरण रावते यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत रोकडे, पोलीस उपनिरीक्षक धनराज केदार व त्यांच्या पथकाने आज पहाटे 3 च्या सुमारास घोडबंदर रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठ जवळ नाकाबंदी केली. यावेळी घटनास्थळी एक लाल रंगाचा ट्रक बेवारसपणे उभा असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या ट्रकची तपासणी केली असता त्यात मक्याची कणसे व त्याखाली गांजा लपवून ठेवल्याचे दिसून आले.ट्रकमध्ये तब्बल 691 किलो गांजा होता. या गांजाची किंमत 1 कोटी 38 लाख रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून ट्रक व गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चालक व मालक यांच्या विरोधात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. हा गांजा कोठून आणण्यात आला व तो ठाण्यात कोणाला पुरवण्यात येणार होता, याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले.


No comments