36 तास उलटूनही बचावकार्य अद्याप सुरु
BY - युवा महाराष्ट्र लाइव- रायगड|
महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 15
जणांचा मृत्यू झाला आहे. तारिक गार्डन ही पाच मजली इमारत 24
ऑगस्टला संध्याकाळच्या सुमारास कोसळली. मृतांमध्ये 7 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश
आहे. या दुर्घटनेला जवळपास 36 तास उलटूनही बचाव पथकाकडून शोधकार्य सुरु आहे.
यात 41 कुटुंब राहत होते. (Raigad Mahad
Building Collapse Rescue operation)या दुर्घटनेत मध्यरात्री उशिरा मेहरुनिस्सा
काझी 65 यांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. तर अब्दुल काझी (70) आणि हबीबा हजवाने
या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर कंमरुनिस्सा अन्सारी यांचा अद्याप शोध सुरु
आहे.
No comments