0

BY - युवा महाराष्ट्र लाइव्ह - शहापूर |
करंजपाडा येथिल जिल्हापरिषद शाळेत 15 ऑगस्ट स्वातंञ्य दिनी गावचे सुपुत्र तसेच युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीचे पत्रकार,खर्डी देवा ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष भास्कर विशे,विवेक डोके,श्री निवास पारापुरात यांच्याकडून तसेच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेत सॅनिटायझर  वस् टँड भेट म्हणून देण्यात आली.यावेळी 15 ऑगस्ट स्वातंञ्य दिनी ज्यांनी आपल्या बलीदानाची आहुती दिली अशा थोर विरांची गाथा गाऊन भारत भुमीत आपण जन्मलो असून आपण भाग्यवंत आहोत असे मोलाचे मार्गदर्शन दिले.यावेळी सोशल डिस्टंसिंग पालनचे करून 15 ऑगस्ट स्वातंञ्य दिन साजरा करण्यात आला.यावेळी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी शाळेतील शिक्षक,कर्मचारीवर्ग,गायकवाड सर,त्याचबरोबर राजेश विशे,वाल्मिक विशे,नरेश विशे,स्वप्नील विशे,ओमकार विशे अन्य मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

 
Top