web-ads-yml-728x90

Breaking News

101 सामुग्रींवर आयातबंदी, राजनाथ सिंहांची घोषणा

BY - युवा महाराष्ट्र लाइव- नवी दिल्ली |

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आत्मनिर्भर भारतासाठी मोठी घोषणा केली आहे (Rajnath Singh Atmanirbhar Bharat announcement). यानुसार संरक्षण मंत्रालयाने भारतात येणाऱ्या 101 वस्तूंवर आयातबंदी करण्याचा निर्णय घेतला. राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटरवर याबाबत घोषणा केली. संरक्षण मंत्रालयाने या घोषणेबाबत आधीच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर माहिती दिली होती. त्यामुळे राजनाथ सिंह यांच्या या घोषणेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “संरक्षण विभाग आत्मनिर्भर भारताला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेत आहे. यानुसार संरक्षण विभाग यापुढील काळात 101 वस्तूंच्या आयातीवर बंदी घालत आहे. या वस्तूंची भारतातच निर्मिती केली जाईल.”


No comments