web-ads-yml-728x90

Breaking News

कल्याण डोंबिवली महानगरपालिका covid-19 साथ रोगात झाली दयनीय अवस्था...


BY - युवा महाराष्ट्र लाइव- कल्याण |
कल्याण डोंबिवली महानगरपालिका covid-19 साथ रोगात झालेली दयनीय अवस्था यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी जबाबदार आहेत कोरोना साथरोग यासारखे भयंकर संकट आल्यावर कमजोर आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजून गेले आहेत रोजची वाढती रुग्ण संख्या रुग्णांचे उपचाराविना होणारे हाल हा प्रकार दुर्दैवी आहे पण याला कारणीभूत येथे असणारे आरोग्य विभागातील अधिकारी जबाबदार आहेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत राहणारे नागरिक यांना माहीतच नाही की फक्त कोरोना नाही तर कोणताही साथरोग असो याचा मुकाबला करण्यासाठी पालिकेचे दोन मुख्यालय व पंधरा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र यामधील आरोग्य कर्मचारी संख्या फार अपुरी आहे एवढ्या मोठ्या महानगरपालिकेकडे स्वतःचे आरोग्य कर्मचारी सुद्धा नाहीत   राष्ट्रीय आरोग्य अभियान या कार्यक्रमांतर्गत साथरोग व इतर आजारापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी केंद्र सरकारने 2015 पासून प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रा करिता आरोग्य कर्मचारी पाठविले होते पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्वतःची रुग्णालय चालविण्याकरिता केंद्राकडून आलेले कर्मचारी स्वतःच्या रुग्णालयात कामास लावले आहेत गेली 5 वर्ष हे कर्मचारी नागरी आरोग्य केंद्रातील कामे सोडून नियमबाह्य पद्धतीने रुक्मिणीबाई रुग्णालय व शास्त्रीनगर रुग्णालयात काम करत आहेत नियमाप्रमाणे या कर्मचाऱ्यांना महापालिकेने पगार देणे गरजेचे आहे तरीसुद्धा राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून पगार या कर्मचाऱ्यांना दिला जातो व स्वतःची कामे करून घेतली जातात अशाप्रकारे पालिका गेली पाच वर्ष आरोग्य अभियानाची सुद्धा फसवणूक करत आहेत तसेच राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना केंद्र अभियानाकडून अल्प प्रमाणात वेतन मिळते त्यांना साधे किमान वेतन सुद्धा दिले जात नाही पालिका प्रशासन या कर्मचाऱ्यांकडून रुग्णालयाची कामे करून घेत असल्यामुळे प्राथमिक नागरिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी संख्या कमी होते त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतो त्यामुळे नागरिकांना मिळणारे आरोग्य सेवेचा सुद्धा बोजवारा उडाला आहे अशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने पालिका प्रशासन येथील आरोग्य विभाग चालवत आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे व याला जबाबदार वैद्यकीय आरोग्य अधिकारी व साथरोग नियंत्रण अधिकारी आहेत हे आपल्या कामाला योग्य न्याय देऊ शकत नाही अशा परिस्थितीत राज्य सरकारने शासनाचा सक्षम आरोग्य वैद्यकीय अधिकारी नेमावा नाहीतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.

No comments