मुरबाड पंचायत समिती सभापती निवड कोणत्या जीआरनी झाली माजी युवा मोर्चा भाजपा अध्यक्षानी टाकला माहिती अधिकार
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे
|
मुरबाड पंचायत
समितीच्या सभापती पदाचा आरक्षण आदिवासी असताना नुकत्याच निवड झालेल्या मुरबाड पंचायत
समिती सभापतीची निवड कोणत्या जीआरने करण्यात आली यांची माहिती भाजपा युवा मोर्चा माजी
अध्यक्ष अनंता दळवी यांनी तहसिलदारांकडे मागितली आहे.लॉकडाऊन कालावधीत सभापतीपदाची निवड होऊन आदिवासी आरक्षणावर ओबीसी
सभापती कसा झाला आडीच वर्षाने आदिवासीचा आरक्षण ओबीसी मध्ये जात असेल तर आदिवासी भागातील
सरपंच पदे आडीच वर्षे ओबीसीना संधी देतील काय याची माहिती मुरबाड तहसिलदार अनंत दळवी
यांना देवू शकले नसल्याने सरकारला याचा खुलासा करावा लागणार आहे.मुरबाड पंचायत समितीची
सभापती निवड जुलैच्या पहिल्या आठवडयात करण्यात आली.त्यासाठी निवडणुक आयोगानी जीआर केव्हा
नवीन काढला जर आडीच वर्षानी आदिवासी सभापतीपद ओबीसीसाठी खुल्ला होणार असेल तर त्याचा
फायदा आदिवासी आरक्षण असलेल्या ग्रामपंचायतीना आडीच वर्षे मिळू शकते काय याबद्दल महसुल
निवडणुक अधिकार्यांकडुन माहिती माहिती अधिकार्यात मिळाल्यास ग्रामीण भागात आनंदोत्सव
साजरा होर्इल अशी चर्चा आहे.मुरबाड शहापुर भागात अनेक ग्रामपंचायतीवर आदिवासी सरपंच
पाच वर्षे काम करतात तेथील बिगर आदिवासी मोठी संख्या असताना सरपंचपदापासून वंचित राहातात
शासनाने ओबीसीनी आदिवासी आरक्षण आडीच वर्षे ठेवल्यास समाधान व्यक्त होर्इल अशी चर्चा
आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
दर आडीच वर्षानी जिल्हापरिषद पंचायत समितीचे आरक्षण बदलते त्या नियमानुसार सभापती निवड झाली आहे.निवडीसाठी जीआर काय आहे.त्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडेच मिळेल.तसेच आदिवासी सरपंच आरक्षण पाच वर्षे असते त्यात बद्दल होत नाही.
श्रीकांत धुमाळ –सभापती,मुरबाड पंचायत समिती
No comments