आपत्ती निवारणार्थ उपाययोजनांना आवश्यक निधी – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
BY - युवा महाराष्ट्र लाइव - सांगली |
गतवर्षी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या काळात जिल्ह्यात अतिवृष्टी
व पूरस्थिती गंभीर होती. या पार्श्वभूमीवर मान्सून काळात संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी
करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन संभाव्य आपत्ती निवारणार्थ उपाययोजनांना निधी
कमी पडू देणार नाही, गतवर्षी झालेल्या नुकसानीचे उर्वरित अनुदानही लवकरात लवकर उपलब्ध
करून देऊ, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात
कोविड-१९, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व मान्सूनपुर्व करावयाचे नियोजन संदर्भात
आयोजित आढावा बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी सहकार
व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत
चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा परिषदेचे
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम,
अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी
मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्यासह संबंधित
विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
No comments