0

BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव- ठाणे |
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, दर दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत असून आजही देशातील बहुतांश भाग लॉकडाऊन असून जनता घरात बसून आहे. परंतु सरकारी यंत्रणा मात्र घरदार सोडून, नागरिकांच्या भल्यासाठी रस्त्यावर उतरली आहे, यात डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ, अग्निशमन दलाचे जवान, महापालिकेचे कर्मचारी यांचा समावेश आहे. परंतु ज्या विभागाने अविश्रांत मेहनत करून कायदा सुव्यवस्था तर राखलीच पण ते करतांना आपले अनेक जवान देखील गमावले, असा विभाग म्हणजे पोलीस विभाग दिवस असो वा रात्र, आपले पोलीस बांधव कायम आपली ड्युटी बजावत असतात त्यातच ह्या कोरोनाने त्यांच्या देखील जीवाला घोर लावला आहे.अनेक पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले व कित्येकांना आपला देखील जीव गमवावा लागला. अशातच आज ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस स्थानकातील ASI लाखात आणि WPC राजिवडे यांना मात्र दुसरा जन्मच प्राप्त झाल्याचा अनुभव आला. कोरोना या जीवघेण्या विषाणूने बाधित झाल्यांनतर या दोन्ही योद्ध्यांनी या रोगावर यशस्वीरित्या मात करून आज आपल्या कर्तव्यावर रुजू झाले. आज त्यांच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या सहकार्यांनी या दोघांवर पुषपवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी प्रथमतः आपल्या पोलीस स्टेशनच्या पाया पडले व आत प्रवेश केला. 


Post a comment

 
Top