web-ads-yml-728x90

Breaking News

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांच्या संख्येत वाढ

BY - युवा महाराष्ट्र लाइव- नवी दिल्ली |

देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण वाघांची संख्या २ हजार ९६७ इतकी असून महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२ वाघांची संख्या आहे. चौथ्या अखिल भारतीय वाघ जनगणनाच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.‘जागतिक टायगर दिना’च्या पुर्वसंध्येला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावेडकर यांनी देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये असणाऱ्या वाघांच्या जनगणनविषयीचा सविस्तर अहवाल आज येथील राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे प्रकाशित केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.वाघ’ हा जंगलाचा राजा असून निसर्गाचे समतोल राखण्यासाठी जंगलाचा महत्त्वाचा घटक समजला जातो. वाघांची वाढती संख्या पर्यावरणात समतोल असल्याचे दर्शविते. वाघ आणि इतर प्राण्यांची वाढती संख्या हे भारताला जागतिक पटलावर महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देण्यात भूमिका निभावू शकतात.


No comments