0

BY - संतोष पिलके,युवा महाराष्ट्र लाइव - चिपळूण|
आमदार शेखर निकम यांनी आपल्या आमदारकीच्या अवघ्या सात महिन्याच्या कारकिर्दीत आपल्या कामाची झलक दाखवली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी वैशिष्ट्यपूर्णमधून दहा कोटींचा निधी मतदार संघासाठी मिळविला असून यातील तीन कोटी देवरूख नगरपंचायतीसाठी व सात कोटी रुपयांचा निधी चिपळूण नगरपालिकेसाठी दिला आहे. या सात कोटींच्या निधीतून मुरादपूर येथील महाराष्ट्र हायस्कूल ते पेठामाप हा पूल उभारण्यात येणार आहे. या पुलासाठीचा प्रस्ताव सुमारे चौदा कोटींचा असून आमदार निकम यांच्या माध्यमातून मिळालेल्या सात कोटीचा निधी या कामासाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहरप्रमुख मिलिंद कापडी यांनी दिली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी माजी नगराध्यक्ष सुचयअण्णा रेडीज, शिरीष काटकर, सतीश खेडेकर, नगरसेवक बिलाल पालकर, वर्षा जागुष्टे, शिवानी पवार, फैरोजा मोडक, राजू जाधव, मनोज जाधव, अक्षय केदारी, सिद्धेश लाड आदी उपस्थित होते. हा पूल झाल्यानंतर गोवळकोटकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठरेल व शहराच्या व बाजारपुलाच्या वाहतुकीवरील ताण कमी होईल, अशी माहिती मिलिंद कापडी यांनी दिली. 

Post a comment

 
Top