BY - अज्ञानसिंग चव्हाण, युवा महाराष्ट्र लाइव- सोयगाव
|
सोयगाव तालुक्यातील
सावळदबारा येथील शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये फेब्रुवारी
/ मार्च 20 मधील एच एस सी बोर्ड औरंगाबाद यांच्या
मार्फत घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत सावळदबारा येथील शिवाजी उच्च माध्यमिक
विद्यालयचा 91.92 टक्के निकाल लागला आहे. तर जय
भवानी उच्च माध्यमिक विद्यालयाचा 91.41 टक्के निकाल येथील जय कालिका देवी शिक्षण
संस्था संचलित शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी चा निकाल विज्ञान. कला.काॅमर्स.या तिन्ही शाखेतील
निकाल 91 .92 टक्के निकाल लागला असून पवन मोहन गायके याने 548 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर द्धितीय हिमानी सुभाष इंगळे
539गुण,तृतीय निकीता रमेश मोरे 520 गुण,संस्कृती शैलेश नगराळे 520 गुण मिळविले आहे. विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यांच प्रमाणे
मोलखेडा ता सोयगाव येथिल जय भवानी माध्यमिक विद्यालयाचा 91.41 टक्के निकाल लागला आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे
संस्थाचे अध्यक्ष भावराव कोलते.सचिव रत्ना कोलते.प्राचार्य नारायण कोलते,प्राचार्य काकडे ,व शिक्षक कर्मचारी व संस्था च्या वतीने मान्यवरच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले मदन डोखळे गजानन चव्हाण ज्ञानेश्वर राठोड व जीवन कोलते
यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या तसेच सावळदबारा
सह परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहेत अशी माहिती प्रा सत्रे शिवाजी सर यांनी बोलताना दिली.
Post a comment