web-ads-yml-728x90

Breaking News

करोना शी लढा देऊन आजी परतल्या घरी...


BY - अज्ञानसिंग चव्हाण,युवा महाराष्ट्र लाइव-सोयगांव/ जामनेर |
जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील 65 वर्षीय महिला आजींना शुगर असून संशयास्पद त्यांची 29/ 6/ 2020 रोजी स्लॅब तपासणीसाठी पाठविले असताना 1/7/2020 रोजी आजी कोरोनाच्या संक्रमित झाल्याचे अहवाल प्राप्त झाले होते त्यामुळे आजींना बुलढाणा कोविंड सेंटर येथे भरती करण्यात आले होते 
पण आजी सुरुवातीपासूनच धाडशी वृत्तीच्या होत्या त्यामुळे आजींनी कोरोनाला न घाबरता डॉक्टरांच्या सूचनेचे परिपूर्ण पालन करून 9 व्या दिवशी आजी कोरोनाच्या जाळ्यातून बाहेर आल्या त्यामुळे गावात व परिसरात आजींच्या नावाचे व धाडसी वृत्तीचे कौतुक केले जात आहे आजी घरी पोहोचताच आजींचे स्वागत करण्यात आले त्यावेळी आजींचा परिवार व गावातील सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी,  व्यापारी, व पत्रकार यावेळी हजर होते

No comments