0

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

राज्यात युरीया खताला असलेली मागणी पाहता केंद्र शासनाकडे पाच लाख मेट्रीक टन अतिरिक्त युरिया साठा देण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना युरीया कमी पडणार नाही, असा दिलासा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिला.राज्यातील खत पुरवठ्याबाबत माहिती देताना कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले, राज्यात पेरणी वेळेवर पूर्ण झाली आहे. पावसामुळे पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. यंदा खरीपाच्या क्षेत्रात वाढ झाली झाल्याचे दिसून येत असून त्यामुळे एकाचवेळी खतांची मागणी वाढली. त्याचबरोबर यावर्षी द्रवरुप खतांचा वापरही कमी होत आहे परिणामी युरीयाचा वापर वाढला आहे.


Post a comment

 
Top