0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - नवी दिल्ली |
गांधी कुटुंबीयांमार्फत चालवण्यात येणाऱ्या राजीव गांधी फाऊंडेशन आणि इंदिरा गांधी ट्रस्ट यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार आहे. या ट्रस्टवर देशाबाहेरून येणाऱ्या देणग्यासंबंधी नियमावली मोडल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. तसेच यामध्ये मनी लाँडरींगचा देखील समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंत्रिमंडळाचे विशेष पथक स्थापन होणार असून त्याचे नेतृत्व सक्तवसुली संचलनालय कार्यालयातील विशेष संचालक करणार आहेत. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी माहिती दिलीय.

Post a comment

 
Top