web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यात प्रथमच नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

राज्यात प्रथमच आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली असून आज ८ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ७ हजार ९२४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार ९४४ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७.८४ टक्के आहे.  सध्या १ लाख ४७  हजार ५९२  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.आज निदान झालेले ७९२४ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २२७ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११२१ (३९), ठाणे- २८० (४), ठाणे मनपा-२४२ (९), नवी मुंबई मनपा-३३२ (७), कल्याण डोंबिवली मनपा-३४३ (११),उल्हासनगर मनपा-९६ (३), भिवंडी निजामपूर मनपा-३७ (५), मीरा भाईंदर मनपा-१०२ (१), पालघर-६४, वसई-विरार मनपा-१९१ (३), रायगड-२३० (२८), पनवेल मनपा-१७२ (१९), नाशिक-७० (३), नाशिक मनपा-१७९ (२), मालेगाव मनपा-१५, अहमदनगर-८२ (२), अहमदनगर मनपा-८७, धुळे-११ (१), धुळे मनपा-१४, जळगाव-३२६ (४), जळगाव मनपा-९३ (२), नंदूरबार-१२ (३), पुणे- १६७ (११), पुणे मनपा-११०४ (१९), पिंपरी चिंचवड मनपा-६५६ (१५), सोलापूर-१८१ (२), सोलापूर मनपा-१२२ (१), सातारा-११५ (४), कोल्हापूर-२९७ (७), कोल्हापूर मनपा-११६ (१), सांगली-३७, सांगली मिरज कुपवाड मनपा-७० (२), सिंधुदूर्ग-१३, रत्नागिरी-१ (२), औरंगाबाद-४३ (१), औरंगाबाद मनपा-२६७ (४), जालना-२९, हिंगोली-१३ (१), परभणी-१, परभणी मनपा-२, लातूर-६६ (१), लातूर मनपा-४८ (१), उस्मानाबाद-२२ (१), बीड-३४ (२), नांदेड-६० (१), नांदेड मनपा-२० (१), अकोला-१२, अकोला मनपा-४, अमरावती-१७, अमरावती मनपा-३५ (१), यवतमाळ-६५, बुलढाणा-६२, वाशिम-१७, नागपूर-७४, नागपूर मनपा-११७ (२), वर्धा-९, भंडारा-१, गोंदिया-८, चंद्रपूर-४, चंद्रपूर मनपा-२, गडचिरोली-३, इतर राज्य ११ (१).आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १९ लाख २५ हजार ३९९ नमुन्यांपैकी ३ लाख ८३  हजार ७२३ नमुने पॉझिटिव्ह (१९.९२ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख २२ हजार ६३७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार १३६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के एवढा आहे.


No comments