0

BY - संतोष पिलके,युवा महाराष्ट्र लाइव- चिपळूण |
नगर परिषद मधून बिल्डिंग बांधकाम परवानगी देताना सोफफिट या निकषावर बिल्डर यांना परवानगी देऊ नये.उपनगर भागात सोफफिट या निकषाने बिल्डिंग परवानगी दिल्याने तळमजल्यातील सदनिकांचे बाथरूम,शौचालय यांच्या पाइप मधून उलटे पाणी सदनिके मध्ये शिरते आणि उपनगर भागात घरात पाणी शिरत असल्याचे दिसून येत आहे.बांधकाम व्यावसायिकांना सांडपाणी चिपळूण नगर परिषद गटार मध्ये सोडव्यास सांगणे गरजेचे आहे. त्याच अटीवर बिल्डिंग परवानगी द्यावी.अशी मागणी नगरसेवक आणि स्थायी समिती व जिल्हा नियोजन समिती सदस्य शशिकांत मोदी यांनी केली आहे.
          नगर परिषदचे गटार नसेल तर बिल्डर कडून ते गटार बांधून घेणे गरजेचे आहे. उपनगर भागात मार्कंडी,कावीळतळी,परशुराम नगर,राधाकृष्ण नगर या भागात सांडपाण्याचा फार मोठा प्रश्न बनला आहे. सोफ फिट तुंबले की सदनिकाधारक लक्ष देत नाहीत त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्या बिल्डिंगच्या सांडपाणीची  दुर्गंधी,डास याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. या बाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी रत्नागिरी, नगर अभियंता रत्नागिरी, मुख्याधिकारी चिपळूण नगर परिषद यांना लेखी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक शशिकांत मोदी यांनी दिली आहे.

Post a comment

 
Top