web-ads-yml-728x90

Breaking News

शहापूर विभागात रेशनिंगचा काळाबाजार ; वाटाघाटीत नागरिकांचे धान्यही खाल्ले

गुगल संग्रहित


BY - 
भास्कर विशे ,युवा महाराष्ट्र लाइव - शहापूर |
ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यात गेल्या 3 महिण्यामध्ये शासनाचे मोफत धान्य,डाळ कार्ड धारकांना आले असून या धान्याचा साठा दुकानदाराने आपल्या गोडाऊनमध्ये करून कार्डधारकाच्या धान्यावर डल्ल मारला असल्याची चर्चा होत आहे.बीपीएल,अंत्योदय रेशनधारकांचे धान्य दुकानदारांनी वाटून खाल्ले असून पुरवठा विभाग अधिकारी यांचे याकडे  दुर्लक्ष झाले आहे.गोरगरिबांचे धान्य कमी वाटून धान्याचा काळाबााजार  केल्याची माहिती काही तक्रारदारांनी युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीचे पत्रकार भास्कर विशे यांना सांगताच सखोल माहिती गोपिनीय स्तरावर  काढून अधिकार्‍यांना जाब विचारला असता उडवा उडवीची उत्तरे देऊन काळयाबाजार करणार्‍या दुकानदारी ठेकेवाल्यांना वाचविण्याचा महाप्रताप कारनामा केला आहे.माहिती मागितली असता माहिती न देता शासकीय नियमावली सांगून काळयाबजारातील दुकानदारांचे बचाव कवच झाले असल्याचे संभाषणातून निदर्शनास आले आहे.3 महिण्यांच रेशानिंग धान्य हा कोणाच्या घशात घातला याची चौकशी करून कोरोनाच्या नावाखाली काळयाबाजाराचा धनीचा शोध घेऊन संबंधित दुकानदार व अधिकारी यांचेवर कारवार्इ करण्याची मागणी येथिल नागरिकांनी केली आहे.शहापूर रेशनिंग दुकानदारांनी केलेल्या धान्याच्या काळाबाजारावर तक्रारी करण्यात आल्या होत्या का ? जर हा तर कारवार्इ कारण्यात आली नाही आणि जर नाही तर धान्य रेशनिंग धारकांना कमी कसे दिल्याची माहिती समोर असतांना तहसिलदारांनी आत्ता पर्यंत चौकशी कारवार्इ कारवार्इ केली गेली नाही असा सवाल येथिल नागरिकांनी केला आहे.
          धान्याचा काळाबाजार तर संपुर्ण महाराष्ट्रात झाला आहे त्यात शहापूर आणि मुरबाड मध्ये होणे ही काही नवी घटना नाही परंतू कोरोना कालावधीत संपुर्ण जग हतबल झाला आहे त्यात काळयाबाजाराचे धनी यांनी कोरोनाच्या नावावर आपले गोडाऊन भरून त्याचा काळाबाजार केला याचा आवाज युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीने उचलल्याने आता शासन याकडे लक्ष देर्इल की काळयाबाजार करणारे अधिकारी,ठेकेदार,दुकानदारांना पाठिशी घालेल ? असा प्रश्‍न केला गेला आहे.

No comments