web-ads-yml-728x90

Breaking News

जाळीचा देव चक्रधर स्वामी मंदिर श्रावण महिन्यातही बंदच

BY - अज्ञानसिंग चव्हाण, युवा महाराष्ट्र लाइव- सोयगाव |

सोयगाव  तालुक्यातील सावळदबारा येथून ५ ते ६ किमी.अंतरावर असलेल्या जाळीचा देव येथील प्रसिद्ध चक्रधर स्वामी मंदिर श्रावण महिन्यात बंदच राहणार आहे.कोरोनाच्या महामारी मुळे भाविकांची गर्दी होऊन संसर्ग होऊनये उपाययोजना म्हणून हा निर्णय जाळीचा देव येथील पुजारी व ग्रामपंचायतने घेतला आहे.या बाबत अधिक माहिती अशी की सावळदबाराचे चक्रधर स्वामी मंदिर व जाळीचा देव मंदीर ५ ते ६ किमी.आहे मंदिर हे या विभागात फार प्रसिद्ध आहे. दरवर्षी प्रमाणें दररोज भाविकांची गर्दी असते, परंतु कोरोना महामारी प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य शासनाने आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे चक्रधर स्वामी मंदिर ही बंदच आहे. येथे श्रावण महिन्यात सद्भभक्त,संत महतं,भाविक खास दर्शनासाठी येतात.श्रावण महिन्यात शेकडो भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे यात्रेचे स्वरूप असते.हे मंदिर डोंगराळ भागात असून चोहीकडे हिरवेगार रान आहे. मंदिर एकांतात असल्यामुळे भाविकांना शातंता व प्रसंन्नाता वाटते निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे मंदिराच्या सौंदर्यतेत आणखी भर पडली आहे. कोरोनाच्या महामारी मुळे सर्वच भाविक दर्शना पासून वंचित राहावे लागत आहे. अशी माहिती  जाळीचा देव येथील मंदीराचे व्यास्थापन समिती अध्यक्ष आनिल पुजारी, राजेंद्र पुजारी, वसंतराव पुजारी, सुरेश पुजारी अंबेकर,बप्पासाहेब पुजारी, आप्पासाहेब पुजारी, सुधाकर पुजारी,सचिन पुजारी, राजू पुजारी, रविंद्र पुजारी  यांनी दिली.


No comments