web-ads-yml-728x90

Breaking News

‘उमेद’ च्या कृतिसंगम प्रकल्पांतर्गत ८२८८ पोषण परसबागांची निर्मिती; वर्धा जिल्हा राज्यात अव्वल


BY - युवा महाराष्ट्र लाइव- वर्धा |
ग्रामीण भागात गर्भवती, स्तनदा माता, बालक आणि किशोरवयीन मुले यांना आहारातून खनिज, लोह, मूलद्रव्ये, प्रथिने इत्यादी पोषकतत्वे मिळून त्यांचे सुव्यवस्थित पोषण व्हावे म्हणून राज्यभरात ग्रामीण जीवनोन्नती  अभियानाअंतर्गत उमेदच्या माध्यमातून कृतिसंगम प्रकल्प राबविण्यात येत आहे.  या प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात पोषण परसबाग निर्मिती करण्यात आली  असून ८२८८ परसबागांची निर्मिती करून वर्धा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
शरीराला पोषकतत्वे न मिळाल्यामुळे अनेक व्याधी निर्माण होतात.  लोह, खनिज आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे रक्तक्षय, रातांधळेपणा, गलगंड, असे आजार महिला, बालके व किशोरवयीन मुली यांच्यामध्ये दिसून येतात. ग्रामीण आणि शहरी झोपडपट्टी  भागात अपुऱ्या पोषणामुळे जन्मताच किंवा जन्मानंतर बालके आणि किशोरवयीन मुले व्याधीग्रस्त झालेली पाहायला मिळतात.म्हणूनच ग्रामीण भागात पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः गरोदर माता,स्तनदा माता,६ ते २४ महिने वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुली यांच्या आहारामध्ये नियमित विषमुक्त, ताजी आणि पोषकमूल्ये असलेली भाजी व फळे असणे आवश्यक आहे.राज्य शासनाने या बाबीवर काम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून कृतिसंगम प्रकल्पांतर्गत २५ जून ते १५ जुलै २०२० दरम्यान ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीम”  हा उपक्रम राज्यभर राबविला. यात जीवनचक्राच्या योग्य वेळी  योग्य व्यक्तीने योग्य कृती अंमलात आणावी म्हणून जनजागृती करण्यात आली. तसेच वैयक्तिक स्वच्छता,हात धुण्याच्या पद्धती व सवयी, शौचालयाचा वापर, स्वयंपाक घराशेजारी स्वच्छ पाण्याच्या स्त्रोताची उपलब्धता याबाबत जाणीवजागृती कारण्यासोबत उच्च दर्जाचे जैविक पद्धतीने पिकवलेल्या पोषणयुक्त भाज्या व फळे गरोदर महिला,स्तनदा माता,६ ते २४ महिन्यातील बालकांच्या तसेच किशोरवयीन मुलींच्या आहारामध्ये आणण्यासाठी भर देण्यात येत आहे.

No comments